
पोलीसांनी दोन प्रमुख कार्यवाहीत अवैध दारु व वाहने जप्त केली, आरोपींवर गुन्हे दाखल
आमगाव : पोलिसांनी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण २१,९३,२९५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी अवैध दारुच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने, दारुचे पव्वे, मोबाईल फोन आणि इतर वस्तू जप्त केल्या. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
प्रथम कार्यवाही : (१७/११/२०२४): आमगाव पोलीस ठाण्याचे पो.उपनि. नरेश सहारे व पोलीस पथक, पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोस्टे परीसरात गुप्त बातमीनुसार पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कट्टीपार गावाजवळ गुप्त माहिती मिळाली की, एक कत्था रंगाची डस्टर गाडीने अवैध दारुची वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी तत्काळ अडथळा निर्माण करुन वाहन चालकाला थांबवले, तर चालकाच्या बाजूला असलेला एक ईसम पळून गेला.
पोलिसांनी वाहन क्रमांक DL 8C AK 4948 ची तपासणी केली, तर त्यामध्ये १८५५०/- रुपयांचा देशी दारुचे पव्वे, १४,०००/- रुपयांच्या देशी दारुचे पव्वे, रॉयल स्टेंग व ओ.सी.ब्लू.चे ७,३८०/- रु., ओल्डमंक आणि आयकॉनिक ब्रँडचे ३४८०/- आणि ३९१०/- रुपयांचे पव्वे जप्त केले. वाहनाची किंमत १२,००,०००/- रुपये असून, एकूण जप्तीचा मुद्देमाल १२,७६,८७०/- रुपये आहे.
आरोपी महेश राजाराम चुटे (३८ वर्षे, रा. गोरठा, ता. आमगाव), विकास शेंडे (रा. भोसा), रवी चुटे (रा. कालीमाटी),राजेंद्र चौरीवार (रा. कट्टीपार),महेंद्र सेवतकर (रा. कट्टीपार),फरार आरोपी मनोज अळमे (रा. मक्कीटोला) ही नावे आहेत.
दुसरी कार्यवाही (१७/११/२०२४): दुसरी कार्यवाही किव्हा दुसऱ्या गुप्त बातमीच्या आधारे, पोलिसांनी कट्टीपार गावात पेट्रोलिंग करतांना एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी आढळली. गाडीतील चालकाने वाहन थांबवले, तर चालकाच्या बाजूला बसलेला एक ईसम पळून गेला.
वाहन क्रमांक MH 35 AG 1717 मध्ये ५५ पव्वे देशी दारुचे ५४२५/- रुपयांचे पव्वे जप्त केले गेले. तसेच, बोलेरो गाडीची किंमत ९,००,०००/- रुपये होती. जप्त मालाची एकूण किंमत ९,१६,४२५/- रुपये आहे.
आरोपी डेलेंद्र लक्ष्मीचंद हरीनखेडे (४३ वर्षे, रा. परसवाडा, ता. गोंदिया), फरार आरोपी सोमेश्वर नंद सोनवाने (रा. परसवाडा, ता. गोंदिया) ही नावे आहेत.
पोलीस पथकात पो.उपनि. नरेश शहारे पोलीस ठाणे आमगाव,पो.हवा. गजपुर ०२,पो.हवा. मेश्राम (१५७),पो.हवा. मुनेश्वर – (१४९६),पो.शि. शेंडे – (४१६)
पो.शि.उपराडे – २१३५,पो.शि. कोडापे (१४२ )अधिकारी व कर्मचारी होते.
सदर कार्यवाहीत जप्त माल आणि आरोपींविरोधात पोलीस ठाणे आमगाव येथे अपराध क्र. ५८१/२०२४ आणि अपराध क्र. ५८२/२०२४ नोंदवले आहेत. आरोपींवर अवैध दारु वाहतूक आणि संबंधित कर करण्यात आले आहे.
सदर कारवाईत पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे.
आमगाव पोलिसांनी अवैध दारुच्या वाहतुकीच्या विरोधात मोठी कारवाई करत २१ लाखांहून अधिक रुपये मूल्याच्या मालावर ताबा मिळवला आहे. पोलिसांनी या कार्यवाहीत सहकार्य करणाऱ्या गुप्त बातमीदारांचा आणि पथकाच्या मेहनतीचा गौरव केला आहे.


