# अनेक युवकांनी घेतले भाजपात प्रवेश
आमगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या विचाराने चालणारे व संविधानाचे मान राखणारे खरे राजकीय पक्ष हे भाजप शिवाय दुसरे नाही. आज संविधानाचे विरोधी काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी नेहमी डॉ. बाबासाहेब यांच्या विचाराचे पतन करताना समोर आले. पण भाजप आजही डॉ. बाबासाहेब यांना वंदन करून त्यांच्या प्रेरणेने चालत आहे. आमचा विश्वास खऱ्या अर्थाने भाजप सोबत आहे व पुढेही राहणार.आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांना समोर करीत भाजप पक्षात प्रवेश करीत आहोत अशी प्रतिक्रिया आंबेडकर वादी युवा नेते गणवीर यांनी वेक्त केले. यावेळी यशवंत मानकर, विक्की मानकर यांच्या पुढाकाराने भाजप नेते व महायुतीचे उमेदवार संजय भाऊ पुराम यांच्या नेतृत्वावर विश्वास वेक्त करीत पक्ष प्रवेश करण्यात आले. युवा नेतृत्व करणारे गणवीरनितेश गणवीर, आकाश बोम्बार्डे विनय मेश्राम, गोपाल हटवार, बलवान गणवीर, मनीष रहिले, सुनील राहुलकर, विशाल मेश्राम, राहुल गडपांडे, चंदू बर्वे, देव आशिष मेंढे,निखिल मेंढे, रोहित राऊत, अनिल बर्वे, किशोर मानकर, सुशील सोनारे, विकास डोंगरे, हर्ष साठवणे, योगेश शहारे, नितीन पाथोडे, आशिष बैलमारे, ओंकार बागडे, संस्कार बागडे, राहुल बोरकर,निखिल आसोले, घनश्याम बरई, अमन यादव, आदि मेश्राम, ज़येष येडे, अविनाश मेश्राम, विकास मेश्राम, अमन गनविर, अमन गनविर, राहुल गंगभोज, तरुन गडपांडे, अभीजीत नागवँशी, अरून गडपांडे आदि युवक कार्यकर्ते यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादान करित डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते गाँधी चौक येते महात्मा गॉंधी जी यांना अभिवादान करित डोल ताशे वाजवित महायुति पक्ष कार्यालय येथे पक्ष प्रवेश घेण्यात आले.यावेळी भाजप जिल्हा अद्यक्ष एड. येशूलाल उपराडे, विधानसभा निवडणूक प्रभारी विजय भाऊ शिवणकर,जयप्रकाश शिवणकर, तालुका अद्यक्ष राजू भाऊ पटले, शहर अद्यक्ष पिंटू अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.