बोरकन्हारच्या बूथ क्र. 111 वर गोंधळ: मतदारांची प्रतीक्षामार्गे त्रासदायक मतदान

0
1004

मतदारसंख्येच्या तुलनेत व्यवस्थापन अपयशी; बूथ विभागणीची मागणी तीव्र

आमगाव : 66 आमगांव विधानसभा क्षेत्र अंतर्गत आमगांव तालुक्यातील बोरकन्हार येथील बूथ क्रमांक 111 वर मोठ्या प्रमाणावर मतदारसंख्या असल्याने मतदान प्रक्रिया गोंधळात गेली. व्यवस्थापनाच्या अभावामुळे 3 वाजल्यानंतर 150 हून अधिक मतदारांना टोकन पद्धतीने मतदान करावे लागत आहे. तासनतास प्रतीक्षेमुळे गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आगामी निवडणुकीत बूथ लहान करण्याची मागणी केली आहे.

आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथील बूथ क्रमांक 111 वर जवळपास 1200 हून अधिक मतदारांची नोंदणी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांसाठी योग्य व्यवस्थापन नसल्याने मतदान प्रक्रिया गोंधळात गेल्याचे पाहायला मिळाले. दुपारी 3 वाजल्यानंतर झेंडीच्या आतील 150 हून अधिक मतदारांना  टोकन देत मतदान प्रक्रिया हळूहळू पार पाडण्यात येत आहे.

गर्दीमुळे मतदारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेषतः याचा त्रास झाला. अनेक मतदारांनी प्रशासनाच्या तयारीविषयी नाराजी व्यक्त केली. व्यवस्थापन अपयशी ठरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर संताप व्यक्त केला.

स्थानिक गावकऱ्यांनी प्रशासनासमोर मागणी केली आहे की, पुढील निवडणुकांमध्ये बूथची विभागणी केली जावी, जेणेकरून मतदारसंख्या प्रमाणात प्रत्येक बूथवर व्यवस्थापन सुलभ होईल. मतदारसंख्येच्या तुलनेत बूथ लहान केल्यास अशा त्रासदायक परिस्थिती टाळता येईल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. बातमी लिहीपर्यंत मतदान प्रक्रिया सुरुच होती.