चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
बल्लारशाह रेल्वे स्थानकावर 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जोधपूर मन्नार गुडी ट्रेनच्या 22673 क्रमांकाच्या B 9 आणि S 1 कोचच्या वर लटकलेल्या OHE हाय व्होल्टेज वायरच्या लोलकाचा काही भाग स्पार्किंग करू लागला, त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. . सुदैवाने, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. ट्रेन संध्याकाळी 7:20 वाजता पोहोचली होती. टीआरडी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वृत्त लिहेपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गाड्या थांबवून दुरुस्तीचे काम सुरू होते.

