मोरगाव अर्जुनी विधानसभेत महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले विजयी…

0
623
Oplus_131072
  • उपजिल्हा प्रतिनिधी/पंकज रहांगडाले 

अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात विधानसभा 2024 च्या निवडणुकीकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडली. या मतमोजणी मध्ये मोरगाव अर्जुनी विधानसभेचे महायुतीतर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले 16 हजार 599 मतांनी विजयी झाले आहेत. महायुतीतर्फे (राष्ट्रवादी अजित पवार गट) राजकुमार बडोले यांना 81 हजार 855 मत, महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस उमेदवार दिलीप बन्सोड 65 हजार 256 मत मिळाली असून महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले हे 16 हजार 599 मतांनी विजयी झाले आहेत.

Previous article69- अहेरी विधानसभा मतदार संघ.. धर्मरावबाबा यांचा १६८१४ मताने दनदणीत विजय….
Next articleतिरोडा गोरेगांव विधानसभेत महायुतीचे उमेदवार विजय रहांगडाले यांचा तिसरा विजय…