- उपजिल्हा प्रतिनिधी/पंकज रहांगडाले
- गोरेगाव : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रात विधानसभा 2024 च्या निवडणुकीकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडली. या मतमोजणी मध्ये तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय रहांगडाले हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले असून त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा 42 हजार 628 मतांनी पराभव केला आहे. भाजपचे विजय रहांगडाले यांना 1 लाख 02 हजार 808 मत मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रविकांत बोपचे यांना 60 हजार 180 मतं मिळाली आहेत. भाजपचे विजय रहांगडाले 42,628 मतांनी विजय मिळवत विजयाची हॅट्रिक साधली आहे.