आमगाव : भवभूती शिक्षण संस्था संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आमगाव येथे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा व स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या प्रवासात योग्य दिशा देणे, महाविद्यालयीन जीवनाशी जुळवून घेण्यास प्रोत्साहित करणे आणि नवीन अभ्यासक्रमाची ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, गोंदिया चे प्राचार्य सुनील चौधरी यांच्या हस्ते झाले.प्रमुख अतिथी म्हणून डॉ. डी. के. संघी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. तुलसीदास निंबेकर यांनी कार्यक्रमात उपस्थिती लावली.
सुनील चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत औषधी निर्माण शास्त्राच्या क्षेत्रातील संधी अधोरेखित केल्या. त्यांनी भारतातील प्रमुख औषध निर्माण कंपन्यांमध्ये करिअर घडवण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला.
डॉ. डी. के. संघी यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रातील संशोधन क्षेत्राकडे लक्ष देण्याचे तसेच महाविद्यालयाच्या अनुशासन, प्रतिष्ठा, आणि प्रेरणा यांचे पालन करण्याचे आवाहन केले.
डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले आणि शिक्षण व करिअरच्या दृष्टीने नवी प्रेरणा मिळवली.
कार्यक्रमाचे संचालन आर्यन गुप्ता,मनस्वी कावळे,पवन अग्रवाल,नंदिनी पातोळे,सुहानी ठाकरे,निकिता नवघडे,भारती नागपुरे,रुपेश्वरी मच्छीरके,गौरव रहांगडाले या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक देवेंद्र बोरकर, महेंद्र तिवारी, जितेंद्र शिवणकर, श्रीमती रोशनी अग्रवाल, श्रीमती राणी भगत, श्रीमती मनीषा बिसेन, श्रीमती दीक्षा खोब्रागडे, आणि परमेश्वर वानखेडे यांचे मोलाचे योगदान होते.
तसेच बी. फार्मसी आणि डी. फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणादायक विचार आणि महाविद्यालयीन जीवनाचा सकारात्मक आरंभ दिला. अभ्यासाबरोबरच शास्त्रातील संशोधन व औद्योगिक ज्ञान आत्मसात करण्याचा संकल्प करत विद्यार्थ्यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी दर्शवली.