उपविभातील मुख्य रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा

0
138

अहेरी जवळील प्राणहिता पोलीस उपमुख्यालय ते अहेरी मुख्य चौक या रस्त्याच्या डांबरीकरनाचे उद्घाटन होऊन दहा महिन्यांच्या काळ लोटला आहे.मात्र संबंधित कंत्राटदाराणे टाकलेली गिट्टी परत उचलली व अद्याप एका साधा खड्डा सुद्धा बुजविला नाही आणि रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही सुरू केले नाही त्यामुळे येत्या सात दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले नाही तर अहेरी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिध्दी पत्रकातुन केला आहे. मागील दहा महिन्यापूर्वी या रस्त्याच्या नूतनीकरण आणि डांबरीकरणाचे उद्घाटन होऊन मात्र कामाला सुरुवात झाली नाही.अहेरी ते प्राणहिता पोलीस उपमुख्यालया पर्यंत हजारो खड्डे पडले आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने संबधीत कंत्राटदाराला ताकीद दिली नाही आणि रस्त्याचे काम सुरू केले नाही. मात्र कामाचे उदघाटन होऊन वर्ष संपायला आले .सामान्य नागरिकांना या रस्त्याचा खूप त्रास होत असून खड्यामुळे दुचाकी चारचाकी खराब होत आहे लोकांना विविध आजार जडत आहे.खड्ड्यामुळे अपघात ही होत आहे त्यासाठी संबंधित कंत्राटदार हा जबाबदार आहे त्यामुळे येत्या सात दिवसात रस्त्याचे डांबरीकरण,नूतनीकरण सुरू झाले नाही तर अहेरी येथे उपोषणाला बसणार असे संतोष ताटीकोंडावार यांनी सांगितले आहे.निवडणूक आटोपल्यानंतर आंदोलनाचा ईशारा दिल्याने प्रशासन काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous articleसंविधान दिवस व 26/11 हल्ल्यातील शहीदांच्या स्मृतिदिनानिमित्त पोलीस पाटलांचा सत्कार
Next articleजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरला येथे २६ संविधान दिवस साजरा