भंडारा/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरला येथे २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने बाल विवाह मुक्त भारत कार्यक्रम राबविण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.ह्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष.जिल्हा परिषद सदस्य मा.बंडुभाऊ बनकर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या प्रथम नागरिक सरपंचा सौ.मीनाताई राहांगडाले तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा.सौ.सुंनदा प्रवीण ठाकरे तथा सर्व सदस्य.ग्रामपंचायत डोंगरला चे सर्व सदस्य जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस.एस.बिसने मॅडम व सर्व शिक्षक व्रुंद तसेच विद्यार्थी.विद्यार्थींनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खेमराज शरणागत यांनी केले

