गोंदिया /पंकज रहांगडाले
भंडारा वरुन सडक/अर्जुनी मार्गे गोंदियाला जात असलेल्या MH 09 EM 1273 या शिवशाही बसचा अपघात घडल्याची घटना आज 29 नोव्हेंबर रोजी एक च्या सुमारास घडली आहे. सदर बसचा अपघात डव्वा परिसरात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 7 च्या वर लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. तसेच दहा ते पंधरा नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.निश्चित आकडा अजून पुढे आला नाही.सदर घटनास्थळी पोलिस व स्थानीक प्रशासन पोहचले असुन जखमी प्रवाशीना प्राथमीक उपचाराकरीता दवाखान्यात हलविन्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.एकूण 11 मृतकांमध्ये 1) स्मिता सूर्यवंशी (32) रा. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)2) मंगला राजेश लांजेवार (60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा 3) राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा 4) कल्पना रविशंकर वानखेडे (65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर..5) रामचंद्र कनोजे (65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा..6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे (60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा7) आरिफ अजहर सय्यद (42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया 8) अजहर अली सय्यद (55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया 9) नयना विशाल मिटकरी (35) राहणार बेसा जिल्हा नागपूर10) अनोळखी पुरुष 11) अनोळखी पुरुष यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांची संवेदना आणि प्रशासनाची कृती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत जखमींना तत्काळ आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने अपघाताची सखोल चौकशी सुरू केली असून जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई केली जाणार आहे.

