अखेर यशोदाला ठार करणाऱ्या आरोपीचीही कारागृहात रवानगी.

0
181
1

पंकज चौधरी/ रामटेक

पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोरडा येथील प्रेयसी पत्नी यशोदा उर्फ भारतीची तिचा पती सचिन घरत याने गळा आवळून हत्या करून तिचा मृतदेह तीन सहकारी मित्रांसोबत मध्यप्रदेश येथील नर्मदा नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली होती. या घटनेत सामील असलेल्या दोन आरोपीना रामटेक पोलिसांनी अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी व एक सहकारी मित्र हे दोघेही भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याने रामटेक पोलीस त्यांना अटक करायला रवाना झाले होते. त्यापैकी मुख्य आरोपी सचिन घरत याला पोलिसांनी पकडून रामटेक ठाण्यात आणले.व त्याला PCR नंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.अजूनही यशोदाच्या हत्येत सहभागी असणारा आरोपी नरेंद्र दोडके अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत येईल अशी माहिती आहे.