प्रतिनिधी/ मुकेश शुक्ला
तुमसर तालुक्यातील माडगी येथे आज दि. 1 डिसेंबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बामचंद रहांगडाले वय 45 वर्षे रा. सितेपार, ता. तिरोडा हा आपल्या पत्नी वैशाली रहांगडाले वय 32 हिच्यासह दुचाकी क्र. MH 36 AF 5045 ने तुमसर कडे जात असताना मागेहून येणाऱ्या कोळसा भरून असलेल्या भरधाव टिप्परने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल केले. यावेळी घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

