एकूण ९१४ खेळाडू विद्यार्थी होणार सहभागी
गोंदिया : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी जि. गोंदिया अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा दि. ७ डिसेंबर २०२४ ते दि. ९ डिसेंबर २०२४ या दरम्यान एकलव्य मॉडल रेसिडेंशियल पब्लिक स्कूल बोरगाव/बा. ता. देवरी जि. गोंदिया येथील क्रीडांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत, यामध्ये एकूण ९१४ खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी दिली असून या स्पर्धांचा उद्देश
आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असल्याचे सांगितले,या स्पर्धेत संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील शासकीय अनुदानित सर्वच विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून अत्यंत खेडीमेडीचे वातावरणात खेळ खेळावे असे आवाहन प्रकल्प स्तरीय क्रीडा समन्वयक सुनील भुसारी यांनी केलेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय पुराम आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र, सहउद्घाटक जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, विशेष अतिथी अपार आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी प्रजीत नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., पोलिस अधीक्षक गोरख भांबरे, अप्पर पोलीस अधीक्षक कॅम्प देवरी नित्यानंद झा तर प्रमुख उपस्थितीमध्ये सविताताई पुराम महिला व बालकल्याण सभापती गोंदिया, राधिका ताई धरमगुडे जि.प. सदस्य गोंदिया,संदीप भाटिया जि.प.सदस्य गोंदिया, उषाताई शहारे जि.प.सदस्य गोंदिया, कल्पनाताई वालोदे जि.प. सदस्य गोंदिया, अंबिकाताई बंजार सभापती प.स.देवरी, प्रल्हाद सलामे सदस्य प.स.देवरी, संजू उईके नगराध्यक्ष देवरी,कल्पनाताई देशमुख सरपंच बोरगाव/बा, कविता गायकवाड उपविभागीय अधिकारी देवरी, अमिता पिल्लेवार सहआयुक्त,उमेश काशीद प्रकल्प अधिकारी देवरी, अमित रामटेके वरिष्ठ संबोधन अधिकारी यांच्या हस्ते पार पडणार आहे.