बीड ते सातोना मार्गावर टिप्परच्या धडकेत तरुण ठार

0
804

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील बीड ते सातोना मार्गावर आज सकाळी सात वाजताच्या दरम्यान भरधाव टिप्परच्या धडकेत तरुण ठार झाला. करण रणवीर बांते वय १८ वर्षे, रा. बीड, ता. मोहाडी असे मृतक तरुणाचे नाव असून हा तरुण दुचाकीने आपल्या बहिणीला कॉलेजला सोडून घरी परत येत असताना बीड ते सातोना मार्गावर भरधाव टिप्परने या तरुणाला जबर धडक दिली. यावेळी टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान संतप्त गावकऱ्यांनी टिप्परचा घेराव करीत रस्ता रोको आंदोलन करीत आक्रोश व्यक्त केला. यावेळी वरठी पोलिसांसह एडिशनल एसपी यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

Previous articleप्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धैचे उद्या होणार उद्घाटन
Next articleअडपलीचक येथे इसमाची गडफास घेऊन आत्महत्या