आलापल्ली च्या मामा तलावात बुडून इसमाचा मृत्यू

0
173

अहेरी /रामू मादेशी

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली च्या मामा तलावात बुडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतकाचे नाव शंकर मदनया चेरलावार वय अं.60 वर्ष रा. गोड मोहल्ला,आलापल्लीअसे आहे.आलापल्ली येथील शंकर चेरलावार हे सकाळी आलापली येथील मामा तलावावर शौच विधीसाठी गेले असता त्यांचा पाय घसरून तलावात मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात आहे. आज दिनांक सात डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच एपीआय देवेंद्र पटले हे घटनास्थळावर आपल्या चमूसह दाखल झाले. घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात एपीआय देवेंद्र पटले करत आहेत.

Previous articleअडपलीचक येथे इसमाची गडफास घेऊन आत्महत्या
Next articleग्रामवासियांकडे लाखो रुपयाची थकबाकी ; विकासाची गती थांबली ; जबाबदार कोण ?