अहेरी/प्रतिनिधी
अहेरी रेपणपल्ली कमलापूर छल्लेवाडा या मार्गावरील मानव विकास मिशनची बस फेरी अनियमित असल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.या मार्गावरील विद्यार्थी कमलापूर येथे शिक्षणासाठी येत असतात परंतु मानव विकास मिशनची सायंकाळची असलेली बसफेरी नियमित येत नसल्याने विद्यार्थिनींना मोठा त्रास झाला होता. सदर बस फेरी नियमित यावी यासाठी येथील पालकांनी व संतोष बोंमवार, कैलास कोडापे, विग्नेश जेट्टीवर, रमेश कडरला, संजय चकनिलवार, रवी कुमार, नवीन ताटपल्ली, दिनेश अरगेली, विजय पब्बलवार, इ्रसाद शेख, विलास नेरला आदिनी गोंडवाना विद्यापीठ सदस्य तनुश्री आत्राम यांना साकडे घातले होते. त्यानुसार आज दिनांक नव डिसेंबर रोजी आगार व्यवस्थापक अहेरी यांना निवेदन देऊन सदर अहेरी छल्लेवाडा बस फेरी नियमित पाठवण्यात यावी अशा मागणीचे निवेदन त्यांनी दिले. विशेषतः सायंकाळी ची बस फेरी ही नियमित व जाईल याचे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिले.