देवरी, दि. १०
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा व सांस्कृतिक मंच करून देण्याचा मानस गोंदिया जिल्हा परिषदेने केले आहे. अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने पंचायत समिती देवरी अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगांव येथे बुधवार दि. ११ डिसेंबर २०२४ ते शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०२४ पर्यंत केंद्र स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव स्थानिय पटांगणावर आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयभाऊ पुराम आमदार देवरी- आमगाव विधानसभा, उद्घाटक सौ. अंबिकाताई बंजार सभापती, सहउद्घाटक अनिलभाऊ बिसेन उपसभापती, सहअध्यक्ष कल्पना वालोदे जिल्हा परिषद सदस्या, उपाध्यक्ष सौ. सविताताई पुराम महिला व बालकल्याण सभापती, ध्वजारोहक ममता अंबादे पंचायत समिती सदस्य, दिपप्रज्वलक सौ. अंजुताई बिसेन सरपंच वडेगांव यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून संदिप भाटिया जिल्हा परिषद सदस्य, उषाताई शहारे जिल्हा परिषद सदस्या, राधिकाताई धरमगुडे जिल्हा परिषद सदस्या, सरिताताई रहांगडाले माजी जिल्हा परिषद सदस्या, जी.टी. सिंगनजुडे गटविकास अधिकारी, एम.एस. मोटघरे गटशिक्षणाधिकारी, एस.जी. वाघमारे शिक्षण विस्तार अधिकारी, एच.जी. राऊत शिक्षण विस्तार अधिकारी, डि.टी. लाळे केंद्रप्रमुख लोहारा, सुभाष करचाल अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, ललिता देसाई अध्यक्ष माता पालक समिती, ललिता भुते पोलिस पाटील वडेगांव, राजकुमार रहांगडाले अध्यक्ष तंटा मुक्ती समिती, डी. एन. बावने ग्रामविकास अधिकारी, मनोहर राऊत माजी सरपंच, छत्रपाल राऊत माजी सरपंच, अविनाश टेंभरे माजी अध्यक्ष तंटा मुक्ती समिती, रमेश बागडे, भोजराज चाकाटे सर, संजय अंबुले सर, धनराज पटले, शैलेंद्र फुंडे, दिलीप फुंडे, चंद्रप्रकाश बिसेन, संजय देसाई, हेमराज बिसेन, रामकिशोर रहांगडाले, गणेश चाकाटे, रामेश्वर देसाई, सदाशिव करचाल, गजानन जमखेडे, सुनिल बिसेन, विजय बिसेन, विनोद बिसेन, प्रेमजी राऊत व लोहारा केंद्रातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य व तालुक्यातील सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र स्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पार पडणार आहे. कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक विभाग कबड्डी, खो-खो, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझिम, प्रेक्षणीय कवायत, वैयक्तिक व सामुहिक नृत्य, गायन व एकपात्री प्रयोग होतील. १३ डिसेंबर २०२४ लां सायंकाळी ५.०० वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल. तरी उपरोक्त तीन दिवसीय केंद्र स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाला सर्व पालक, नागरिकांनी उपस्थित राहून शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साह वाढवा असे आवाहन वडेगांव ग्राम वासियांनी व जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा वडेगांव येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

