तिन दिवशीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर – प्रकल्प अधिकारी उमेश काशीद
देवरी : आदिवासी विकास विभागांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प स्तरावरील क्रीडा स्पर्धा दि.७/१२/२०२४ ते ९/१२/२०२४ या दरम्यान संपन्न झाल्या यावेळी जिल्हा परिषद गोंदिया च्या महीला बालकल्याण सभापती सौ.सविताताई पुराम यांनी सांगितले की एखादा जिंकला म्हणून खूप आनंदित होऊ नये तर एखाद्याचा पराभव झाला म्हणून खचून न जाता नवीन जोमाने जिंकण्यासाठी तयारी करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल,परीश्रम ही यशाची किल्ली असल्याचे यावेळी सांगितले त्याचप्रमाणे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असून आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
तिन दिवशीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा यादृष्टीने सांघिक व वैयक्तिक मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये एकूण ९१४ विद्यार्थी सहभागी झाले होते,या स्पर्धेत कबड्डी,खो खो,व्हालीबाॅल,हॅन्डबाॅल, धावण्याची, गोळा,भाला, थाली फेक इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या व मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले , या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शेंडा केंद्र तर द्वितीय स्थान बिजेपार केंद्रानी पटकाविला, बक्षीस वितरण समारंभ सविताताई पुराम सभापती महिला व बालकल्याण जि.प गोंदिया,संजू उईके नगराध्यक्ष नगर पंचायत देवरी,टी आर काळेल पोलिस निरीक्षक चिचगड,खासबागे पोलीस उपनिरीक्षक चिचगड ,उमेश काशीद प्र.अ.देवरी ,डाॅ सायली चिखलीकर स.प्र अ देवरी, उत्तम दरों अध्यक्ष शा.व्य.स.कन्या आश्रम शाळा बोरगाव बाजार,होमराज पुस्तोडे तसेच शासकीय आश्रमशाळेतील सर्व मुख्यधापक मंडळी यावेळी उपस्थित होते,
ही स्पर्धा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुल बोरगाव बाजार येथील मैदानावर खेळल्या गेल्या, बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन भिवगडे सर यांनी तर आभारप्रदर्शन शिवाजी तोरकड यांनी केले.संपुर्ण क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिरीष सोनेवाने, सुनील भुसारी, विनोद गायकवाड तसेच प्रकल्प कार्यालयातील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील सर्व मुख्याध्यापक, गृहपाल,अधिक्षक,शिक्षक तसेच सर्व कर्मचार्यांचा मोलाचा वाटा होता.