अहेरी /रामू मादेशी
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली च्या मामा तलावात बुडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली होती . सदर प्रकरण ताजे असतानाच आज बुधवारी पुन्हा एकदा एका इसमाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.मयत इसमाचे नाव, नामे – बंडू सीताराम कुमरे, वय – 56 वर्षे, रा. कोरेत मोहल्ला, आलापल्ली असे आहे.बंडू कुमरे यांनी आत्महत्या केली की तलावात पाय घसरून त्यांचामृत्यू झाला याविषयीं उलटसुलट चर्चा परिसरात आहेत . आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 च्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच एपीआय देवेंद्र पटले हे घटनास्थळावर आपल्या चमूसह दाखल झाले. घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात एपीआय देवेंद्र पटले करत आहेत.

