शेतकऱ्यांची कोणीही फसवणूक करू नका….. फसवणूक झाल्यास खबरदार…….सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा इसारा

0
288

गडचिरोल्ली;-जिल्ह्यात शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर सर्रास लूट केली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांना निदर्शनात येताच त्यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले व प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर होणारी लूट कदापि सहन करणार नाही सविस्तर अशे की आविका संस्था व फेडरेशन हमीभावाणे धान खरेदी करतात.आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटीशर्ती नुसार हमीभाव धान खरेदी करावे लागते.शासनाच्या नियमाप्रमाणे 40.600 घ्यायचे धोरण आहे परंतु सर्रास शेतकऱ्यांकडून 41.600 किव्हा 42 kg घेतले जाते.जिल्ह्यात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग अशिक्षित असल्यामुळे धान खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल करून पिळवणूक केली जाते व क्विंटलच्या मागे अडीचते तीन किलोची लूट केली जाते.या मुळे शाशन धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होतांना दिसत नी उलट शेतकऱ्यांचे नुकसान होतांना दिसते.याच पिळवणुकीला थाम्बविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की एखाद्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत असेल त्याबाबत चा जाब व्यवस्थापक किव्हा सचिवांना विचारावा त्याच क्षणी संबंधित तुम्ही तुमच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला त्या सचिवावर स्वतःही तक्रार नोंदवून गुन्हे दाखल करू शकता. किव्हा धान खरेदी केंद्रावर काटा करताना खरेदी वजनाचे फोटो की व्हिडीओ 9405645963 या नंबर वर पाठवावे किव्हा आम्हाला संपर्क करावे आम्ही तुमची बाजू शासन दरबारी मांडू व पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवू असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.