दीर्घकालीन दूरदृष्टीचा अभ्यास करा – उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे

0
114

नीलकमल स्मृती गुणवत्ता पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी प्रतिपादन

सडक अर्जुनी : “आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य करिअर घडविण्यासाठी चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. वाचनाची सवय लावा, पाया मजबूत करा आणि दीर्घकालीन दूरदृष्टी ठेवा,” असे प्रतिपादन अर्जुनी/मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी केले. ते चिखली येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात मार्गदर्शन करत होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून नीलकमल स्मृती फाऊंडेशनच्या वतीने रत्नदीप विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शालांत परीक्षेत उत्तम यश संपादन करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त विद्यार्थी गणेश महेश बोरकर: प्रथम क्रमांक,हिमांशी अरविंद भांडारकर: द्वितीय क्रमांक काजल ज्ञानेश्वर कोरे: तृतीय क्रमांक यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, संविधान पुस्तक, पुष्पगुच्छ, आणि रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.

“शिक्षण केवळ औपचारिकतेसाठी घेऊ नका. चांगले यश संपादन करून आई-वडिलांचे स्वप्न साकार करा. पाया मजबूत असेल तर भविष्यात यशस्वी इमारत उभी राहील. दीर्घकालीन दूरदृष्टी ठेवून कठोर परिश्रम करा,” असे शहारे यांनी सांगितले.

उपरोक्त कार्यक्रमात डॉ. राजकुमार भगत (सेवानिवृत्त प्राध्यापक): “विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे शिल्पकार बनावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावेत.” असे उदगार राजकुमार भगत से.नि. प्राध्यापक यानी व्यक्त केले. “सपने मोठी ठेवा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करा.” असे प्रेरणा कटरे (नायब तहसीलदार) यांनी विद्यार्थ्याना संदेश दिला. पी.डी. बांबोळे (सहायक पोलीस निरीक्षक) यांनी  “शिस्त व कठोर परिश्रम हे यशाचे मार्ग आहेत.” असे आपल्या संबोधनात सांगितले.

उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहून विचार मांडले.विद्यार्थ्यांनी गीत व भाषण सादर करून कौशल्यांचे प्रदर्शन केले.नीलकमल स्मृती फाऊंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल. एम. पातोडे होते.
सूत्रसंचालन शिक्षक एस. बी. मेंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका जयश्री कढव यांनी मानले.

डुग्गीपार पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक पी.डी. बांबोळे, चिखली केंद्रप्रमुख करुणा वासनिक, पत्रकार शाहिद पटेल, शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानाने शिक्षण व प्रगतीची नवी दिशा ठरली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वर्षांत अशाच सकारात्मक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.

 

Previous articleसमाज मा गूंजन लगेव पोवारी भाषा को आल्हादित स्वर…!
Next articleश्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल रिसामा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे