गोंदिया : आज १२ ते १४ डिसेंबर तीन दिवसीय कालावधीत (कटंगी) केंद्र स्थरीय क्रीडा स्पर्धा जि.प.उच्च प्राथमिक शाळा हिवरा ता.गोंदिया येथे क्रीडा सत्र २०२४ – २०२५ गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांच्या शुभ हस्ते व समाजकल्याण सभापती सौ.पूजा अखिलेश सेठ यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.
विद्यार्थी अवस्था हि परिवर्तनशील असून शिक्षणांबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसीक विकास व्हावा या हेतूने खेळ व सांघिक भावना, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता व एकाग्रता वाढीस लागावी. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक तसेच शारीरिक खेळांतील कौशल्यांचा व सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळांच्या विद्यार्थ्यांना खेळ व सांस्कृतिक मंच उपलब्ध करून देण्याचे उत्कृष्ट कार्य जिल्हा परिषद करीत आहे. यामाध्यमातून अनेक प्रतिभावान विद्यार्थी बाहेर येतील आणि विविध स्तरावर नावलौकिक करतील असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
केंद्र स्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक समारोहाला सर्वश्री राजेंद्र जैन, पूजा अखिलेश सेठ, सरला चिखलोंडे, मोहिनी वराडे, ब्रिजलाल मारगाये, सतीश दमाहे, राजेश परिहार, संजयप्रसाद लिल्हारे, विनोद नंदेश्वर, प्रतिभा ठाकरे, संजय माहुले, शाम धमगाये, दिनेश दसरे, स्वप्नील अंबादे, राजकुमार ढोमणे, भाग्यश्री माहुले, स्वाती नंदेश्वर, इशुलाला माहुले, रायभान साखरे, डॉ माणिकचंद ठाकरे,दिनेश ठाकरे सहित मान्यवर उपस्थित होते.
या तीन दिवसीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांचे सांघिक खेळ, कबड्डी, खो – खो, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम व अन्य कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

