गोंदियाच्या ईगल किकबॉक्सिंग अकॅडमीचा खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकला
गोंदिया : दिल्ली येथे 9 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत राष्ट्रीय शालेय खेल महासंघाने वुशु स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेतला होता.दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत सिद्धार्थचे कौशल्य उंचावले.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील ईगल किकबॉक्सिंग अकॅडमीचा सिद्धार्थ हेमने याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि कांस्य पदक जिंकले. सिद्धार्थच्या यशामुळे गोंदिया जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल झाले आहे.
सिद्धार्थने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक तेजसिंह आलोट सर, अंजनकर सर, हेमंत चावके सर, क्रीडा शिक्षक ललित पटले सर, तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे. मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झाल्याचे त्याने सांगितले.
सिद्धार्थच्या यशाबद्दल जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी खुरपुडे मॅडम, क्रीडा अधिकारी मरसकोले सर, विशाल ठाकुर, दीपक सिक्का, अंकुश गजभिये, संगम बावनकर, रामेंद्र बावनकर, मुकेश शेडे, कोमल रहिले, विश्वास चौहान, अजित सवालाखे यांनी त्याचे अभिनंदन केले. सिद्धार्थच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
सिद्धार्थच्या मेहनतीने गोंदिया जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. त्याच्या यशामुळे जिल्ह्यातील इतर खेळाडूंना स्पर्धात्मक उत्साह निर्माण झाला आहे. क्रीडा क्षेत्रात त्याने साधलेले हे यश भविष्यातील खेळाडूंसाठी दिशादर्शक ठरेल.
सिद्धार्थच्या पुढील यशासाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. सिद्धार्थचे यश गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

