

ओंग्रिड सोलर यंत्रणा उभारणी आणि पंप दुरुस्तीची कामे सुरू
आमगांव : बनगांव प्रा. नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रात ओंग्रिड सोलर यंत्रणेची बसवणी आणि संप पंपाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांसाठी दिनांक १६ डिसेंबर २०२४ (सोमवार) आणि १७ डिसेंबर २०२४ (मंगळवार) रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
बनगांव जलशुद्धीकरण केंद्रावर ओंग्रिड सोलर यंत्रणा उभारणीचे काम सुरू आहे. ही यंत्रणा बसवल्याने पाणीपुरवठा योजनेची कार्यक्षमता वाढेल व विजेची बचत होईल. याशिवाय संप पंपाचे देखभाल व दुरुस्तीची कामेही सुरू करण्यात आली आहेत .
पाणीपुरवठा बंदीचे दिवस : सोमवार, १६ डिसेंबर २०२४,मंगळवार, १७ डिसेंबर २०२४ या दोन दिवसांदरम्यान सकाळपासून रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.गैर-आवश्यक पाणी वापर टाळून संयम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे योजनेची कार्यक्षमता वाढेल आणि दीर्घकालीन सेवा अधिक सुसाट होईल. पंप दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल तर सोलर यंत्रणेने विजेचा खर्च कमी होणार आहे.
मा. कार्यकारी अभियंता यांच्या निर्देशानुसार ही कामे केली जात असून, नागरिकांनी संयम पाळावा आणि सहकार्य करावे.
सदर आदेश मा. आर आर सतदेवे उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग आमगांव यांच्या सूचनेनुसार देण्यात आला आहे.






