डी.बी.ए पब्लिक स्कूल अहेरी येथे स्व.स्नेहादेवी आत्राम यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा संमेलनाचे आयोजन 

0
70

गडचिरोली /प्रतिनिधी

भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा स्वर्गीय स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांची जयंती आज डी.बी.ए पब्लिक स्कूल अहेरी येथे साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त डी.बी.ए पब्लिक स्कूल मध्ये तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. सदर क्रीडा संमेलन 14,15 व 16 डिसेंबर रोजी चालणार असून आज क्रीडा संमेलनाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सपना सलमवार या प्रामुख्याने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून आदरांजली वाहन्यात आली. गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.तसेच जीवनात खेळाला अतिशय महत्त्व असून खेळामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो त्यामुळे प्रत्येकानी विविध खेळ खेळून आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा असे तनुश्री ताईंनी क्रीडा संमेलनाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिनांक 14 डिसेंबर रोजी फॉग जम्पिंग म्युझिकल चेअर कॅरम स्लो सायकल चेस असे विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक 15 व 16 डिसेंबर रोजी पेरेंट्स गेम, रनिंग, कबड्डी, खो-खो असे विविध खेळाचे आयोजन डीबीए पब्लिक स्कूल मध्ये करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक प्रदीप देशपांडे, रणजीत सर,अन्सार सर, विकास सर, मनोज कैदलवार सर ,हिना मॅडम, मनीषा मॅडम, सपना मेश्राम मॅडम,वैष्णवी मॅडम,कशीस मॅडम सह विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleकेंद्र स्तरावर अडपल्ली चक ही  शाळा ठरली चॅम्पियन
Next articleमातृभाषा को महत्व व साहित्य को वर्गीकरण : एक मौलिक विश्लेषण