अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024
जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती आमगाव यांचे आयोजन
क्रिडा सत्र दि.१८,१९,२०,व २१डिसेंबर पर्यंत चालणार
आमगांव : दि.१८ डिसेंबर २०२४ रोजी अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत तालुका स्तरीय क्रीडा सत्राचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाम्हणी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. जिल्हा परिषद गोंदिया आणि पंचायत समिती आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालकल्याण सभापती सौ. सविताताई पुराम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती आमगावचे सभापती मा. राजेंद्र गौतम होते.
कार्यक्रमाचे सहअध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ. छबुताई महेश उके आणि उपसभापती मा. नोहरलाल चौधरी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाचे कार्य जिल्हा परिषद सदस्य सौ. उषाताई मेंढे यांनी केले.
कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती आमगावच्या विविध मान्यवरांची उपस्थिती होती. त्यामध्ये सुरेश हर्षे, हनवत वटी, किशोर महारवाडे (जिल्हा परिषद सदस्य),सरपंच ग्रा.प.बाम्हणी सुभाष थेर आदि मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
पंचायत समिती सदस्य:सौ. सुनंदाताई उके,सौ. योगिताताई पुंड,सौ. सरिताताई हरीणखेडे,सौ. गीताताई शेंडे,सौ. शीलाताई ब्राह्मणकर आदि सदस्य गण उपस्थित होते.
तसेच मा.ए.के. गिरेपुंजे (गटविकास अधिकारी)मा. आर.एस. येटरे (गटशिक्षणाधिकारी) प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात मा. राजेंद्र फुन्ने (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष),सौ. शीलाताई रहिले (पोलीस पाटील, बाम्हणी)मा. देवराज धावडे (तंटामुक्ती अध्यक्ष),सौ. उषाताई राऊत (उपसरपंच), घनश्याम कटरे (अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था, बाम्हणी)ग्रामस्तरीय प्रतिनिधी
व सर्व ग्रामपंचायत सदस्य गण उपस्थित होते.
तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्य आणि सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्रात कबड्डी,खो-खो,धावपट्टी स्पर्धा ,शॉटपुट,वादविवाद,समूहगान या विविध खेळ आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
उपरोक्त कार्यक्रमाच्या अनुसंघाने खेळांमध्ये विद्यार्थ्यांचा अतिशय चुरशीचा सहभाग दिसून आला.उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भाषणे देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती आमगावच्या पदाधिकारी, शिक्षक, बाम्हणी ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींचे विशेष सहकार्य लाभले.

