जीईएस रिटायर्ड कर्मचारी संघाचा स्नेह सम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न

0
292
1

 

सत्य साई मंदिर, गड्डाटोली, गोंदिया येथे संपन्न

 जीईएस रिटायर्ड कर्मचारी संघाचा स्थापना दिवस

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेमधून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आयोजित स्नेह सम्मेलन कार्यक्रम अत्यंत जल्लोषात व यशस्वीरीत्या पार पडला. संघटनेने वर्षभर राबविलेल्या कार्याची माहिती व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करण्याचा हा विशेष प्रसंग होता.

उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. जफर खान (सेवानिवृत्त प्राध्यापक, नमाद महाविद्यालय) प्रमुख अतिथी डॉ. ललित जिवानी (सेवानिवृत्त प्राचार्य, सालेकसा),डॉ. मृत्युंजय सिंह (सेवानिवृत्त प्राचार्य, तिरोडा) विशेष अतिथी लिलाधर पाथोडे (प्रदेश सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी संघटना),सुखनंदन तुरकर (अध्यक्ष, जीईएस रिटायर्ड कर्मचारी संघ) मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गो.शि.संस्था चे संस्थापक स्व. मनोहरभाई पटेल व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संघटनेचे सचिव संजय जायसवाल यांनी प्रास्ताविक केले आणि वर्षभर संघटनेच्या उपक्रमांची माहिती दिली.

प्रमुख भाषणे: लिलाधर पाथोडे (सरचिटणीस):संघटना चालवणे ही एक कठीण जबाबदारी असल्याचे नमूद करत, अशा प्रकारचे कार्यक्रम रिटायर्ड कर्मचाऱ्यांना ऊर्जा देतात, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पेंशनसंबंधी कोणतीही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

डॉ. ललित जिवानी:सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना मजबूत करणे व त्यांना एकत्र आणणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. मृत्युंजय सिंह: संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन जीवनाचा आनंद घ्यावा आणि अशा कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

सदर कार्यक्रम अंतर्गत श्रीमती हटवार (रावनवाडी),सी.बी. बिसेन (सहसचिव),डॉ. जिवानी, चौरागडे, श्रीवास्तव, मडामे, एफ.सी. पटले  नव्या सदस्यांचा समावेश व सत्कार करण्यात आला

कार्यक्रमात भजन सी.एल. हनवते,भक्तीगीत सुखनंदन तुरकर,पेंशन गीत सी.बी. बिसेन,फिल्मी नगमे: संजय जायसवाल,गझल व देवी जागरण कृष्णा चौरसिया व डी.आर. भारती असे विविध सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष सुखनंदन तुरकर यांनी आय-व्यय पत्रक सादर केले आणि संघटनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी पुढील वर्षाची वर्गणी वेळेवर भरण्याचे आवाहन केले.

अध्यक्ष प्रा. जफर खान यांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी कार्यामुळे आनंद व्यक्त केला आणि पुढील सामाजिक कार्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे संचालन सी.बी. बिसेन यांनी केले, तर आभार प्रदर्शन के.पी. चित्रिव यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करणारे सदस्य रामटेक्कर, एन.के. रहांगडाले, एच.बी. जायसवाल, ए.ए. पंढरी, सुनील श्रीवास्तव, डी.आर. चौरागडे, व्ही.जे. मडामे, सी.डी. नान्हे, वंदना शामकुवर, सुशिला पोरचट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

कार्यक्रमानंतर डॉ. ललित जिवानी यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाने जीईएस रिटायर्ड कर्मचारी संघाच्या कार्याची दिशा स्पष्ट केली आणि संघटनेच्या भविष्यातील योजनांसाठी नवी ऊर्जा दिली.