सेवा श्रमदान कार्याला सात वर्षे पूर्ण
सालेकसा : तालुक्यातील नाव रूपास आलेला स्थानिक मोक्षधाम आमगावखुर्द सालेकसा येथे सात वर्षांपूर्वी श्रमदानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कार्याला एक वेगळीच प्रसिद्धी मिळाली आहे. सतत सात वर्षापर्यंत प्रति रविवारला सात वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत सुरू असलेल्या हया श्रमदान कार्यमुळे नक्कीच या मोक्षधाम परिसराचा कायापलट झाला आहे.
श्रमदान कार्याला सात वर्षे पूर्ण झाले असून मोक्षधाम सेवा समितीच्या वतीने मिलन समारोह ,वर्षपूर्ती कार्यक्रम श्री अर्धनारेश्वरालय शिवगण मंगल भवन हलबिटोला येथे आयोजित करण्यात आला. या आयोजित कार्यक्रमाला प्रामुख्याने दिलीप पांडे, विनोद जैन, विजय फुंडे, मायकल मेश्राम, रितेश अग्निहोत्री यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांना व समिती कार्यकर्त्यांना सांगताना मोक्षधाम सेवा समिती अध्यक्ष संदीप दुबे यांनी सुरू असलेल्या श्रमदान कार्याविषयी मार्गदर्शन केले व आपण सर्वांच्या सहकार्याने निरंतर हे सेवाभावी श्रमदान कार्य सुरूच राहील असे वक्तव्य मांडले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोक्षधाम बहुउद्देशीय सेवा समितीचे उपाध्यक्ष मनीष असाटी ,सचिव संतोष कवरे ,सहसचिव बाजीराव तरोने, कोषाध्यक्ष सुनील असाटी, काशिनाथ पाथोडे, अरुण तावडे, रमेश चुटे, राहुल देऊळकर, राजू चुटे, राजेंद्र टेंभरे, अकील सय्यद, अनिल अग्रवाल, आशिष पटले, योगेश तरोने, दिलीप फुंडे यांनी अथक परिश्रम घेतले.

