कायम विनाअनुदानित इग्रंजी माध्यमाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पी. एफ. लागु करा

0
141

भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडी, पुव॔ विदर्भ कडून शिक्षक उपसंचालक, नागपूर यांना कायम विनाअनुदानित इग्रंजी माध्यमाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पी. एफ. लागु करण्यासाठी निवेदन देण्यात आले. काॅण्वेंटचे शिक्षक अनेक वर्षे कायम विनाअनुदानित इग्रंजी माध्यमाच्या शाळांना सेवा देत असतात. मात्र त्यांची सेवा संपल्यानंतर त्यांना सध्या तरी शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांची सेवा शुद्धा कधीही संस्थापकाकडून संपविल्याण्यात येते. अशातच शिक्षक आघाडी पुर्व विदर्भ कडून नागपूर विभाग उपसंचालक यांना या शिक्षकांना पी. एफ. लागू करावा असे निवेदन देण्यात आले. विदर्भ संयोजक अनील शिवणकर, सहसंयोजक संदिपकुमार उरकुडे, पुष्पराज मेश्राम, मोहनिश राऊत, योगेश धाडसे, सुहास महाजन, मनीष भटेरो इत्यादी उपस्थित होते. आधीच सदर शाळेतील शिक्षक हे तुटपुंज्या वेतनात आपले अध्यापनाचे कार्य पुर्ण करीत असतात. शिवाय शिक्षण विभागातील सर्व अटी यांना शुद्धा लागु असतात. भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीने यांच्या प्रश्नांची दखल घेत , त्यांच्या भविष्यातील तरतूद म्हणून केंद्रं सरकारने तयार केलेला पी. एफ. कायदा 1952 मध्ये अस्तित्वात आला. 1982 मध्ये शिक्षण संस्थाचा शुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला. पण प्रत्यक्षात कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षक यापासून वंचित आहेत. या अडचणीची जाणीव घेतली व उपसंचालक कार्यालयात निवेदन दिले.

Previous articleराज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर…..
Next articleकोहळीटोला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार