सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र शहारे यांचा उपक्रम
सडक अर्जुनी : ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोहळीटोला / चिखली येथील सन 2024 च्या वार्षिक परीक्षेत इयत्ता पहिली ते सातवीमध्ये प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोहळीटोला येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय कामगार संघटना जिल्हा नाकाचे अध्यक्ष जितेंद्र शहारे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून 21 डिसेंबर 2024 ला इयत्ता पहिली ते सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश झोडे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम, बाम्हणीचे सरपंच माधोराव तरोणे, ओबोसी कृती समितीचे तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे, चिखलीचे उपसरपंच अनिल बोरकर, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कुर्वे, कोहळीटोला येथील शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष चंचल बडोले, शाळेच्या उपप्रमुख नितु पटले आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांनी थोर महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले .याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक, सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय कामगार संघटना जिल्हा नाकाचे अध्यक्ष जितेंद्र शहारे यांच्याकडून मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिलीचा विद्यार्थी वेदांत चंचल बडोले,इयत्ता दुसरी -कु. आराध्या संघपाल मेश्राम, इयत्ता तिसरी-प्रेम धनराज हेमणे, इयत्ता चौथी -अर्णव राहुल बडोले, इयत्ता पाचवी -कु. पूर्वी अरविंद नेवारे, इयत्ता सहावी -कु. क्रितीका देवनाथ कोहळे व इयत्ता सातवी -चेतन संजय लाळे आदी प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार प्रदान करून व पुष्पगुच्छ देऊन पालकांसहित गौरविण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र शहारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, ‘प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविण्यासाठी खूप अभ्यास करावे. मेहनत घ्यावी.
आई-वडिलांचे, शाळेचे नाव उज्वल करावे.त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा व इतर थोर महात्मे, थोर पुढारी यांचे विचार अंगिकरावे.’
याप्रसंगी केक कापून आयोजक जितेंद्र शहारे यांचा वाढदिवस साजरा करून उपस्थितांनी शुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे आयोजक जितेंद्र शहारे यांनी राबविलेल्या सदर उपक्रमाची उपस्थितांनी आपल्या मनोगतातून प्रसंशा केली.
कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते महादेव जांभुळकर यांनी केले तर आभार शाळेच्या उपप्रमुख नितु पटले यांनी मानले.
कार्यक्रमाला शिक्षक शिवचंद राठोड, निना हटेले, दिनेश बोरकर, पवनकुमार कापगते, जयश्री सूर्यवंशी, सुप्रिया शहारे, गायत्री शहारे, विजेंद्र शहारे, राहुल बडोले, रवी बडोले, विद्यार्थ्यांचे पालक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

