आल इंडिया ब्लाइंड गोल बाल ४थी राष्ट्रीय अजिक्यपद स्पर्धा गोंदियात आयोजित

0
268
1

पूर्णतः अंधत्व असलेले खेळाडू घेणार भाग

गोंदिया येथील सुरुची ओमप्रकाश गुप्ता ची झाली निवड

गोंदिया : आल इंडिया ब्लाइंड गोल बाल ४थी राष्ट्रीय अजिक्यपद स्पर्धा दिनांक 25 डिसेंबर २०२४ ते 28 डिसेंबर २०२४ या कालावधीत या खेळाचे आयोजन गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे.
ब्लाइंड स्पोर्ट्स एसोसिएशन गोंदिया महाराष्ट्र च्या वतीने पैरालंपिक गोल बाल स्पोर्ट्स एसोसिएशन मुंबई महाराष्ट्र च्या संयुक्त विद्यमाने 25 डिसेंबर ते २८ दिसबंर 2024 होत असलेल्या गोल बॉल स्पर्धेचे आयोजन गोंदिया येथील क्रीडा संकुल येथे करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन नागपूर विभागीय शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होणार आहे.

गोल बॉल स्पर्धा ही राष्ट्रीय स्पर्धा असून पूर्ण अंधत्व असलेले खेळाडू डोळ्याला पट्टी बांधून या खेळात भाग घेतात. देशाचा विविध राज्यातून जवळपास २० टीम या खेळात भाग घेणार आहे.कु सुरुची ओमप्रकाश गुप्ता या गोंदियातील तरुणीची महाराष्ट्र राज्य गोल बाॅल टीम मध्ये निवड झाली आहे, नुकतेच मुंबई येथील कामगार कल्याण क्रीड़ा केंद्र मुम्बई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य स्तरावर गोल बाल स्पर्धा खेळून गोंदिया महाराष्ट्र चे नाव सुरुची गुप्ता या तरुणीने लौकिक केले आहे.
कार्यक्रमात श्री राजू कुथे अध्यक्ष ब्लाइंड स्पोर्ट्स एसोसिएशन गोंदिया महाराष्ट्र ,तसेच  डॉ महेन्द्र हेमने सर ब्लाइंड स्पोर्ट्स एसोसिएशन गोंदिया यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती असणार आहे.