नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत देवरी प्रकल्प तब्बल पाच वर्षांनंतर उपविजेता

0
206
1

प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांच्या प्रयत्नांना यश

देवरी प्रकल्पातील ५८ सांघिक व १३ वैयक्तिक खेळाडू विद्यार्थ्यांची झाली राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

देवरी : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत नऊ प्रकल्पाधून देवरी प्रकल्प तब्बल पाच वर्षांनंतर द्वितीय स्थान पटकावून उपविजेता ठरला असून प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांचा यामध्ये सिंहांचा वाटा आहे.

अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर अंतर्गत येणाऱ्या देवरी,चिमुर,चंद्रपुर, भंडारा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अहेरी,भामरागड अशा नऊ प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमधून एकूण 2983 विद्यार्थ्यांनी विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला होता, या स्पर्धा दि.19 डिसेंबर 2024 ते दि.21 ‍डिसेंबर 2024 या कालावधीत तालुका क्रिडा संकुल ब्रम्हपुरी येथे संपन्न झाल्या,या विभागीय क्रिडा स्पर्धेत एकूण 173 गुणांची कमाई करून देवरी प्रकल्पाने ५ वर्षा नंतर सर्वसाधारण उपविजेते पद पटकावले आहे.

देवरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी सांघीक खेळामध्ये कबडडी, खो-खो, व्हॉलीबॉल,हॅडबाॅल व वैयक्तिक मैदानी खेळात चालने, धावणे, लांब उडी, उंच उडी यामध्ये यश संपादन केले आहे. वैयक्तिक मैदानी स्पर्धेत चालणे या खेळात काजल उईके, सुजल तुलावी ,लांब उडी मनिष सहाळा, हसीना सोंजाल,माया नरेटी,कनक मडावी,उंच उडीत आशा चुलपार,विशाखा सलामे,वर्षा टुणुराम, आकाश वटटी या खेळाडूंनी पदक प्राप्त केले,राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी देवरी प्रकल्पातील सांघिक खेळांमध्ये ५८ विद्यार्थी तर वैयक्तिक मैदानी खेळासाठी १३ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे हे विशेष,
विभागीय क्रिडा स्पर्धेत देवरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त यश संपादन करावे यासाठी प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत अतिशय उत्तम नियोजन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रकल्प अधिकारी सायली चिखलीकर,विनोद गायकवाड,शिरीष सोनेवाणे,सुनिल भुसारी व शिक्षक दिपेश मांडे तसेच प्रकल्प कार्यालयातील संपूर्ण अधिकारी,कर्मचारी तसेच शासकीय तथा अनुदानित आश्रमशाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.