परभणी घटनेच्या निषेधार्थ चामोर्शी शहरातून निघाला विविध संघटनांचा धडक मोर्चा

0
143

प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले चामोर्शी-:परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांनी मारहाणीत झालेला मृत्यू, देशाचे गृहमंत्री मा.अमित शहा यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेतील अवमान जनक वक्त्यव्य तसेच बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील मराठा समाजातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या सर्व घटनांच्या विरोधात सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या वेळीस समितीच्या वतीने धडक मोर्चा हजारोच्या संख्येने महिलां व पुरुषांचा मोर्चा २३ डिसेंबर रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला त्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांना निवेदन देण्यात आले

विविध मागण्यासाठी सर्वपक्षीय निषेध मोर्चा आयोजन समितीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता हा धडक मोर्चा येथील बाजार चौक येथून शहरातील प्रमुख मार्गांनी मार्ग भ्रमण करीत हजारोच्या संख्येने घोषणा देत मोर्चा निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर करून त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत, कुणबी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पाल, डॉ. सुरपाम, मदन उंदिरवाडे, चंद्रगुप्त कोटांगले, प्रफुल कोटांगले ,राज बनसोड, अतुल येलमुले, डी, एस रामटेके, विनोद खोबे, श्याम रामटेके,सत्यवान सोरते, अँड, डीम्प्पल उंदीरवाडे , माणिक तुरे, आदींनी यानी मार्गदर्शन करताना परभणी , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अवमान करणारे वक्तव्य, बीड जिल्ह्यातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला .या मोर्च्यात सम्यक बौद्ध समाज मंडळ आंबेडकर वार्ड चामोर्शी, मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड. जिजाऊ ब्रिगेड,. प्रेरणा बौद्ध मंडळ चामोर्शी,. जगतगुरू तुकाराम महाराज कुणबी समाज बहुउद्देशिय संस्था चामोर्शी,. सावित्री रमाई महिला मंडळ चामोर्शी, . भोई ढिवर केवट समाज संघटना चामोर्शी, . बौद्ध समाज मंडळ कुनघाडा,. बौद्ध समाज मंडळ नवरगाव,बौद्ध समाज मंडळ जोगना, जयसेवा फाऊंडेशन फोकुर्डी, समता बौद्ध विहार लालडोंगरी चामोर्शी संगिता उंदिवाडे, प्रणाली कोटांगाले, पंचशिल समाज मंडळ जामगिरी, पंचशील बौध्द समाज मंडळ मुधोली रिठ, बौध्द समाज मंडळ म. फुले वार्ड चामोर्शी,सम्राट अशोक बुद्ध विहार मुरखळा चक, बुद्ध विहार भेंडाळा,आदिवासी समाज संघटना जामगिरी माळी समाज संघटना जामगिरी आदी, माडे मुढोली समाज मंडळ, हळद वाही समाज मंडळ, सोशल येज्युकेशन मुहमेंट, कांग्रेस, आझाद समाज पार्टी, तसेच तालुक्यातील सर्व गावकरी

संघटनानी सहभाग घेतला होता यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा चौक बंदोबस्त होता..

Previous articleनागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत देवरी प्रकल्प तब्बल पाच वर्षांनंतर उपविजेता
Next articleतहसील कार्यालय मुलचेरा वर धडक मोर्चा