मुलचेरा /मारोती कोहरे
दिनांक 23/12/2024ला 11 वाजता ता. प्रबुद्ध कार्यकारिणी मुलचेरा यांचे वतीने तहसील कार्यालय मुलचेरा वर धडक निषेध मोर्चा
मुलचेरा तालुक्यातील बौद्ध समाज बांधव तहसील कार्यालयावर जाऊन देशात घडत असलेल्या घटनावर जसे 1)परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विठ्ठबना 2)सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू. 3)देशाचे गृह मंत्री मा. अमितशाह यांचे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी संसदेतील अवमान जनक वक्तव्य याच्या विरोधात धडक मोर्चा व तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्येक्त केला.तर यामध्ये तालुका कार्यकारिणी श्री शुभमभाऊ शेंडे अध्यक्ष विनोद झाडे उपाध्यक्ष कालिदासजी दुर्गे सचिव रवींद्र जी झाडे सहसचिव, सूर्यकुमार चांदेकर, प्रफुल दुर्गे, गमतीदास अलोने, बंडू चांदेकर, नामदेव रामटेके,आनंद रामटेके, राहुल दुधे, भगीरथ गोंगले, महेंद्र गोंगले, अक्षय गोंगले, बंडू फुलझेले,आणी प्रत्येक गावागावातील सदस्य व महिला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून रॅली काडून झालेल्या घटनावर निषेध व्यक्त केला.

