आमगाव – बाम्हणी येथील भवभूति महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. चंद्रकुमार केवलराम पटले यांची एम.पी. देव मेमोरियल सायन्स कॉलेज, धरमपेठ, नागपूर येथे जीवशास्त्र विषयाच्या व्याख्याता पदावर नियुक्ती झाली आहे.
डॉ. पटले यांनी आपल्या जिद्द, चिकाटी, समर्पण, दृढ निश्चय आणि विश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देण्याचा त्यांचा निश्चय आहे.
त्यांच्या या यशाबद्दल गुरुजन, परिजन, स्नेही आणि मित्रमंडळींनी त्यांचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. पटले यांची ही यशस्वी वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

