सालेकसा / बाजीराव तरोने
तालुक्या अंतर्गत येत असलेल्या नाभिक समाज संघटनेची शिवसेना कार्यालय बसस्थानक परिसर सालेकसा येथे बैठक झाली असून नवीन कार्यकारणी व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीमध्ये सर्वानुमते नवीन नाभिक समाज संघटना तालुका सालेकसा ची कार्यकारणी तयार करण्यात आली या नवीन कार्यकारणीचे अध्यक्ष किशोर लाडेकर, सचिव भुमेश्वर एकुलकर, उपाध्यक्ष चैनलाल मौदेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र चावके ,सहकोषाध्यक्ष अंकुश सूर्यवंशी आणि सदस्य म्हणून तालुक्यातील व्यावसायिक घटक वर्ग यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली. या बैठकीला प्रास्ताविक अशोक कावळे तर सूत्रसंचालन अंकुश सूर्यवंशी यांनी केले.

