गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शोकसभा आयोजित
गोंदिया – भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक स्तरावर ख्याती मिळवलेले अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या शोकसभेत डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक विकासात आणि भारताला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहून नमन केले.
या शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये राजेंद्र जैन, विनोद हरिनखेड़े, अशोक सहारे, नानू मुदलियार, अविनाश काशिवार, केतन तुरकर, जगदीश बावनथड़े, विनीत सहारे, अखिलेश सेठ, पंकज चौधरी, विनायक खैरे, लखन बहेलिया, संजीव राय, एकनाथ वहिले, बिसराम चर्जे, चुन्नीलाल सहारे, भागेश बिजेवार, पिंटू बनकर, सुनील पटले, शैलेश वासनिक, रौनक ठाकुर, तुषार उके, हर्षवर्धन मेश्राम, पप्पू वज्जा, श्रेयष खोब्रागडे, कपिल बावनथड़े, कुणाल बावनथड़े आणि शुभम भावे यांचा समावेश होता.
पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्याची आठवण काढत, त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वगुणांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

