जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
पंचायत समिती तुमसर अंतर्गत येणाऱ्या देवसर्रा केंद्राचे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दिनांक 23,24,25 डिसेंबर ला संपन्न झाल्या.या महोत्सवात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सुकळी नकूल संघाने सर्वाधिक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जिंकून केंद्रस्तरीय चॅम्पियन चषकावर आपला नाव कोरला.यामध्ये प्राथमिक मूले खो-खो, प्राथमिक मुली कबड्डी,माध्यमिक मुले खो-खो ,माध्यमिक मुली कबड्डी,माध्यमिक मुली खो-खो व माध्यमिक विभाग समूहनृत्य या स्पर्धांचा समावेश आहे.
या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात विजयी झालेल्या चमूंना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश पारधी,पं.स.सदस्य कंचनलाल कटरे,पं.स.सदस्य आशाताई लांजे,सुकळी नकूल ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला नागपूरे,उपसरपंच सोहनलाल पारधी,गोंडीटोला ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल चिंचखेडे, उपसरपंच अनिल राऊत,बिनाखीचे उपसरपंच राजेंद्र बघेले,सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र तुरकर,ग्रा.पं.सदस्य सुनिल शिवने,अमरदीप गोंडाने,गीता आंबेडारे,अंतकला राहांगडाले,स्वाती पटले,शाळा समितीचे अध्यक्ष निलेश गोंडाने, उपाध्यक्ष अर्चना सहारे,अनिल राहांगडाले,योगेश्वर राहांगडाले,संतोषकुमार चौधरी,रेखा राहांगडाले,मनिषा राहांगडाले,माजी अध्यक्ष संजयराव राऊत,वैनगंगा देवस्थान समितीचे अध्यक्ष देवेंद्र राहांगडाले,धान व्यापारी रोहीत अंबूले मोहनिश राऊत, पंचायत समिती तुमसरचे वरीष्ठ लिपीक वामन भगत,लहान नेता संतोष गौतम, केंद्रप्रमुख अशोक खेताडे व मुख्याध्यापक सुभाष बिसने यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या प्रसंगी देवसर्रा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.

