आदर्श विद्यालयात वीर बालक दिवस उत्साहात संपन्न

0
177

आमगाव :  केंद्र शासनाने 26 डिसेंबर हा दिवस वीर बालक दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त आदर्श विद्यालय, आमगाव येथे गुरू गोविंद सिंग यांचे सुपुत्र साहेबजादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वीर बालक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक यू. एस. मेंढे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून एच. एच. पटले आणि प्रमुख वक्ता म्हणून सौ. एस. जे. बागडे उपस्थित होते.कार्यक्रमात 16 विद्यार्थ्यांनी गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांची साहसी कथा विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे सादर केली. यापैकी काही विद्यार्थ्यांनी जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांचा वेष धारण करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

प्रमुख वक्त्यांनी जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या त्याग आणि बलिदानाच्या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या. त्यांनी आपल्या भाषणात या वीर बालकांनी अत्यंत कमी वयात आपल्या देशाच्या सन्मानासाठी बलिदान दिल्याची आठवण करून दिली.

अध्यक्षीय भाषणात  यू. एस. मेंढे यांनी या वीर बालकांची कहाणी अजरामर राहील असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना या प्रेरणादायी घटनेतून शिकण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाचे संचालन कु. दिव्या मेहर हिने केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. पी. ए. असाटी यांनी केले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. गुरू गोविंद सिंग यांच्या साहसी मुलांनी दाखवलेला त्याग, धैर्य आणि निष्ठा यांचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याचा संकल्प केला.