तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी मुख्यमंत्र्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन 

0
90
1

गडचिरोली /प्रतिनिधी 

 दिनांक एक जानेवारी 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळेस त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. गोंडवाना विद्यापीठ च्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यातील काही प्रलंबित समस्यांच्या विषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. त्यामध्ये प्रामुख्याने 1) गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागातील वर्ग क व ड संवर्गातील पद स्थानिक उमेदवारांकडूनच भरण्यात यावे.2) गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी व गडचिरोली आगारासाठी नवीन बसेस देण्यात यावे.3) गडचिरोली जिल्ह्यातील 51 प्रभाग संघांना प्रभाग संघ कार्यालय तयार करून देण्यात यावे.4) गडचिरोली जिल्ह्यातील कार्यरत उमेद कॅडर व मॅनेजर यांना 20 टक्के अतिरिक्त प्रोत्साहन पर मानधन देण्यात यावे. अशा विविध मागण्यांचा समावेश होता. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सदर मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांना दिले आहे.