मुंडीपार येथील मारबत घाटावर अवैध गौण-खनिज रेतीचे उत्खनन
वाघनदी पात्रात अवैध उत्खननावर छापा—सात आरोपी अटकेत
आमगांव : आमगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत १६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या नेतृत्वाखाली ३ जानेवारी २०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक आणि घाटटेमनी बीट अमलदारांनी संयुक्त कारवाई केली.गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वाघनदी पात्रातील मुंडीपार येथील मारबत घाटावर अवैध गौण-खनिज रेतीचे उत्खनन आणि चोरी सुरू आहे. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.
रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर छापा : कारवाईदरम्यान, वाघनदी घाटातून मुंडीपार गावाकडे रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली अडवण्यात आले.
पहिला ट्रॅक्टर: ट्रॅक्टर क्रमांक: MH 35 AR-3002,ट्रॉली क्रमांक: MH 35 AW-5577
,रेती: 1 ब्रास (₹6,000/-),ट्रॅक्टर किंमत: ₹7,00,000/-,ट्रॉली किंमत: ₹1,50,000/-
एकूण किंमत: ₹8,56,000/-दुसरा ट्रॅक्टर: ट्रॅक्टर क्रमांक: MH 35 AJ-1855,ट्रॉली क्रमांक: MH 35 AJ-9886
,रेती: 1 ब्रास (₹6,000/-)
,ट्रॅक्टर किंमत: ₹6,00,000/-
,ट्रॉली किंमत: ₹1,50,000/-
एकूण किंमत: ₹7,56,000/-
मुद्देमालाची एकूण किंमत: ₹16,12,000/- आहे.
अटक आरोपींची नावे अनुक्रमे : लखन खेमचंद मानकर, पुनम सुखराम मडावी,राजेंद्र नंदलाल बोपचे,टीकाराम श्रीराम मेश्राम,संदीप मंगलुजी दखनकर, हितेश रोशनलाल सुरसाऊत,शुभम राजेंद्र बोपचे सर्व आरोपी आमगांव तालुक्यातील मौजा मुंडीपारचे रहिवासी आहेत.
आरोपींविरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात खालील गुन्हे दाखल—
1. गुन्हा क्रमांक 04/2025 – कलम 303(2), 3(5) भारतीय दंड संहिता
2. गुन्हा क्रमांक 05/2025 – कलम 303(2), 3(5) भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशानुसार झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली—पोलीस निरीक्षक तिरुपती राणे (आमगाव पोलीस ठाणे),पो.उ.नि. नरेश सहारे,पो.ह.वा. खुशालचंद बर्वे ,पो.ह.वा. दसरे,पो.शि. विनोद उपराडे ,चेतन शेंडे,असिम मन्यार नितीन चोपकर आदि कारवाईत अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
पोलीस हवालदार खुशालचंद बर्वे हे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी अवैध गौण-खनिज उत्खननावर आळा घालण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक नागरिकांनी अवैध उत्खननाची माहिती पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
आमगाव पोलिसांनी अवैध उत्खनन करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी अवैध उत्खननाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

