आंतरराष्ट्रीय स्तरावर कवी प्रभाकर देविदास दुर्गेचा सत्कार

0
129

मुलचेरा /मारोती कोहरे

भिडेवाडाकार विजय वडवेराव आयोजित देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत जगातील पहिलाच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे २०२५ पहिल्यांदाच एस. एम. जोशी फाउंडेशन सभागृह नवी पेठ पुणे येथे दिनांक २ जानेवारी २०२५ ते ५ जानेवारी २०२५ चार दिवस जगभरातील ६०० हुन अधिक जास्त साहित्यिकांच्या उपस्थितीत साजरा होत असून या आंतरराष्ट्रीय संमेलनात अध्यक्ष म्हणून उपस्थित सहभागी सर्व कवी/कवयित्री आहेत.   ज्यात निमंत्रित कवी म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक या खेड्या गावातील युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे यांनी देखील पहिल्याच दिवशी सहभाग नोंदवून देशातील मुलींची पहिली शाळा : भिडेवाडा ही स्वरचित प्रेरणादायी कविता सादर करत टाळ्यांच्या गजरात उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.  त्यांचं साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच त्यांचं योगदानाबद्दल आयोजक भिडेवाडाकार विजय वडवेराव सर यांच्या हस्ते संविधान, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा पट्टा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.  या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्र तसेच राज्या बाहेरील तसेच देश-विदेशातील साहित्यिकांचा समावेश होता. त्यांच्या या सत्काराबद्दल उपस्थित मान्यवर, कवी/कवयित्री, नातेवाईक, गाववासीय, साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार या सर्वांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे