पोलीस स्थापना दिन उत्साहात साजरा – विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती

0
178

विद्यार्थ्यांची मिरवणूक व पोलीस स्टेशन भेट – पोलिसांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास

आमगाव – महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी आमगाव पोलीस स्टेशनतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आदर्श विद्यालय, आमगाव येथील विद्यार्थी, शिक्षक व पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला भेट देऊन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मा.प्रमोद मडामे साहेब, आमगाव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, पोलीस उपनिरीक्षक गीते, महिला पोलीस हवा. छिपे, पोलीस शिपाई बिसेन तसेच पोलीस स्टेशन आमगाव येथील इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गुन्हे तपास, शिस्तपालन, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

आदर्श विद्यालय, आमगावचे प्राचार्य  डी. एम. राऊत आणि शिक्षकवर्गासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पोलिसांविषयी आत्मीयता निर्माण झाली आणि त्यांना सामाजिक सुरक्षा यंत्रणेची जवळून ओळख मिळाली.