

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाला आले यश… प्रशासनाचे मानले आभार
गडचिरोली जिल्ह्यात अनेक ग्रामीण भागातील नागरिकांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले होते परंतु त्यांना वाळू उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटी कोंडावार यांनी वारंवार निवेदन देऊन घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानुसार नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी पंचायत समिती, अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, मुलचेरा व सिरोंचा मार्फत विचीत तहसिलदार यांना घरकुल आवास योजनेतंर्गत वाळू मिळणेकरीता यादी सादर करण्यात आलेली असून घरकुल लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी 5 ब्रास याप्रमाणे वाळू/रेती उपलब्ध करुन देण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी संबंधित तहसीलदारांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आता घरकुल बांधकाम करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाला यश आले मुळे त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.






