सावित्रीबाई फुले जयंती व वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम साजरा

0
154
1

ग्रंथप्रदर्शन व प्रेरणादायी विचारांचा कार्यक्रम संपन्न

आमगाव: भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ०३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती आणि वाचन संकल्प महाराष्ट्र या उपक्रमाचा भव्य आयोजन करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर यांची अध्यक्षीय उपस्थिती लाभली.

प्राचार्य डॉ. निंबेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले यांचे समाज परिवर्तनातील योगदान आणि महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची महत्ता विशद केली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी समाजसुधारणेसाठी योगदान द्यावे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादनाने झाली. वाचन संकल्प महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने औषधी निर्माण शास्त्रातील १५० पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित केले.

प्रा. रोशनी अग्रवाल यांनी प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देत समाजसुधारणेतील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. प्रा. देवेंद्र बोरकर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करून नोट्स आणि प्रेरणादायी विचार टिपून ठेवण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सहप्राध्यापक आणि डी. फार्म व बी. फार्मचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.