आमगांव : अखिल भारतीय माळी महासंघ, बाम्हणी यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष कार्यक्रम दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता ग्राम बाम्हणी येथील आखर येथे पार पडणार आहे.
आमदार मा.संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव, सामाजिक एकता आणि महिला सक्षमीकरणावर चर्चा होणार आहे.
कार्यक्रमासाठी गावातील सर्व समाजबांधव आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

