सशक्त भाजपा, विकसित भारत: अहेरी विधानसभेची सदस्य नोंदणी कार्यशाळा संपन्न*
अहेरी विधानसभा भाजपा सदस्यता नोंदणीचे प्रमुख मा.खा.अशोकजी नेते यांनी अहेरी व आलापल्ली येथे कार्यशाळेला विशेष मार्गदर्शन केले._
दि.०४ जानेवारी २०२५
अहेरी विधानसभेतील अहेरी व आलापल्ली येथे भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
“सशक्त भाजपा, विकसित भारत” या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात केली असून, देशातील पहिला सदस्य म्हणून भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नोंदणी केली आहे.
कार्यशाळेत संबोधित करताना भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, तालुक्यातील प्रत्येक बूथवर किमान २०० सदस्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे. बूथ प्रमुख, पंचायत समिती प्रमुख व जिल्हा परिषद प्रमुख यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. देशभर ५ जानेवारी २०२५ रोजी प्रत्येक बूथवर सदस्य नोंदणी अभियान यशस्वीरीत्या राबविले जाईल. जिल्ह्यात हे अभियान १५ जानेवारीपर्यंत चालणार असून, एक लाखाहून अधिक सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे.
*सदस्य नोंदणीसाठी*
8800002024 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास मेसेजद्वारे लिंक मिळेल, ज्याद्वारे सदस्यत्वाची नोंदणी करता येईल.
तसेच, “मोदी ॲप” डाऊनलोड करूनही सदस्य होता येईल.
जिल्हा व तालुका पदाधिकारी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला किमान १०० सदस्य नोंदवणे अनिवार्य आहे.
या कार्यशाळेत जेष्ठ नेते व ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे आणि जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी देखील मार्गदर्शन केले.
*कन्यका माता मंदिर सभागृह या ठिकाणी कार्यशाळेला अहेरी येथे उपस्थित मान्यवर:*
तालुका अध्यक्ष संतोष मददीवार, शहर अध्यक्ष मुकेश नाम्मेवार, जिल्हा उपाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमो शहर अध्यक्ष अमोल गुडडेलीवार, तालुका उपाध्यक्ष नितीन गुंडावार, नगरसेविका शालिनी पोहनेकर, नगरसेवक विकास उईके यांसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
*आलापल्ली येथे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला उपस्थित मान्यवर..*
जिल्हा उपाध्यक्ष विनोदजी आकनपल्लीवार,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशजी दत्ता, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गंफावार, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजयजी सरकार,मच्छीमार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष मोहनजी मदने, ता.महामंत्री सुकमा हलदार, ता.महामंत्री निखिल हलदार, ता.महामंत्री विजय बिशवास, जि.प.क्षेत्र प्रमुख अशोक चकनपवार,जि.प.क्षेत्र प्रमुख बाबला मुजुमदार, जेष्ठ नेते अशोक आत्राम, यूवा नेते सागर डेकाटे,पोशालु चूधरी,महिला नेत्या रहीमा सिद्धीकी,मनोज वरगंटीवार,यांसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण सदस्य नोंदणी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या बूथवर प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले.

