सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर – बाम्हणीत 194 वी जयंती उत्साहात साजरी

0
209

महापुरुषांचा गौरव, स्त्री सक्षमीकरणाचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी संदेश!

आमगांव : अखिल भारतीय माळी महासंघ शाखा बाम्हणीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. बाम्हणीच्या आखर परिसरात सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या नियोजित संकल्पाचा शुभारंभ या कार्यक्रमात करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मा. संजय भाऊ पुराम होते. उद्घाटन श्रीमती छबुताई उके (जिल्हा परिषद सदस्य) यांनी दीपप्रज्वलनाने केले.

मान्यवर उपस्थिती आणि प्रमुख पाहुणे सर्वश्री एच. एम. फुंडे ,देवरी प.स.उपसभापति अनिल बिसेन ,विद्याताई शिंगाडे (माजी सरपंच, बाम्हणी),सुभाष जी थेर (सरपंच, ग्राम बाम्हणी),श्रीमती निरूबाई ब्राम्हणकर (माजी सरपंच, बाम्हणी), देवराज भाऊ धावडे (महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, बाम्हणी),श्रीमती शिला ताई रहिले (पोलीस पाटील, बाम्हणी),डॉ. तुळशीराम  नागरिकर,अशोक भाऊ देशकर (अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ, बाम्हणी शाखा),श्रीमती प्रतिमा ताई भेदे (ग्रामपंचायत सदस्य),श्रीमती देवांगन बाई उपरीकर (ग्रामपंचायत सदस्य), भेजलाल भाऊ पटले (माजी सरपंच), बुधराम विठ्ठले, रामाजी परतेती,सुरजसिंग मळावी (वन हक्क समिती अध्यक्ष)यादोराव विठ्ठले व गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात मा. संजय पुराम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “आजच्या काळातील स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या उंचीवर पोहोचत आहेत. हे सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या लढ्याचे फळ आहे. राष्ट्रपतीपदी पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख करत, त्यांनी स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण दिले.”

उद्घाटक श्रीमती छबुताई उके यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करत महिलांनी शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश दिला.

गावातील लहान शाळकरी मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नृत्य, नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सादरीकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. योगेश भाऊ नागरिकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती कोमल बाई नागरिकर यांनी मानले.अखिल भारतीय माळी महासंघ शाखा बाम्हणीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समाज बांधवांनी विशेष मेहनत घेतली.

सामाजिक एकता, शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणाचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप झाला. गावातील बहुसंख्य नागरिक, महिला, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाला भव्य स्वरूप दिले.