पोवार समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास आणि पाश्चात्य संस्कृतीचे प्रभाव नवी पिढी आणि पालकांची जवाबदारी

0
1027
1

पोवार समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन आणि पालकांची भूमिका-समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मूल्यांचा संरक्षण महत्त्वाचा !

आमगांव : बडेजावपणा जोपासण्याच्या नादात नविन पिढी पोवार समाजाची वैशिष्टय़पूर्ण संस्कृती न स्विकारता पाश्चिमात्य संस्कृतीचे मोठ्याप्रमाणावर अनुसरण करीत आहे. परीणामी शैक्षणिक प्रगती व सामाजिक मुल्य यांचे नैसर्गिक संतुलन बिघडलेले आहे.
पोवार समाजाचे काही मुले मुली सामाजिक परंपरांना केराची टोपली दाखवित आंतरजातीय विवाहाचा अंगीकार करून आपले आपले सामाजिक अधःपतन करून घेत आहेत.

पालकांनी पोवार समाजाच्या प्राचीन वैशिष्टय़पूर्ण संस्कृतीचे पालन स्वतःसह नविन पिढीला सुध्दा व्हावेत या करीता प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित प्रत्येक कार्यक्रमात पोवार समाजाच्या संस्कृतीचे दर्शन होईल असे तार्किक व्याख्यान आयोजित केल्या जातात.
पालकांनी सहपरीवार उपस्थित राहणे गरजेचे आहे. या शिवाय आपल्या मुलांमुलींना सामाजिक संस्कृतीचे दर्शन होणार नाही, हे लक्षात ठेवावे.
पोवार समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी
इतिहासीक तथ्यांवर आधारीत सामाजिक माहीती गुगल बुक्स वर संग्रहीत आहे. समाजबंधु, भंगीनीनी प्लेस्टोअर वरील उपलब्ध गुगलबुक्स च्या सहाय्याने सामाजिक साहित्य संपदाचे अधोभारण करावे व त्याचे निरतंर वाचन करावे. संपादित ज्ञान सामाजिक विचार मंचावरून नविन पिढिला देण्याचा निरंतर प्रयत्न केल्यास सोईचे होईल.
आपल्या कडील साहीत्य गुगल बुक्स वर संग्रहीत करणे सामाजिक हिताचे होईल.

2026 ला होणाऱ्या जनगणनेत मातृभाषा म्हणून पोवारी भाषा नोंदविल्यास, सामाजिक प्राबल्याची शासन दरबारी नोंद होईल.
सामाजिक चेतना व सुरक्षेसी निगड़ित महत्वाची माहिती महासंघाच्या विविध सामाजिक व्यासपीठ किंवा डिजिटल प्लेटफॉर्म च्या माध्यमातून, गूगल्स बुक, फ़ेसबुक, गूगल आर्चीव, विकिपीडिया, व्हाट्सएप, कुंटुम्ब एप्प, इंटरनेट ब्लॉग्स इत्यादि वरुन अधोभारण करता येईल.
नवीन पिढ़ी ने सुद्धा आपली महत्वपूर्ण भूमिका बजावून आई- वडिलांची काळजी घेणे तसेच उत्तरत्या वयात त्यांची सेवा-संगोपन करण्याची सामाजिक जवाबदारीचे भान ठेवण्यात सदैव तत्पर असावे.
असे प्रतिपादन अखिल भारतीय क्षत्रिय पोवार(पंवार) महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. विशाल बिसेन यांनी केले.
रविवार ता. 05 जाने. रोजी धामनगांव (आमगांव) येथे आयोजित पोवार समाज संमेलनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय संबोधनात ते बोलत होते.
सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन क्षत्रिय पोवार राजाभोज समीती धामनगांव (खुर्द) च्या वतिने करण्यात आले होते.

पोवारी संमेलनाचे उद्घाटन आमगांव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रीय महासचिव प्राचार्य खुशाल कटरे (सेवानिवृत्त), महासचिव इंजिनिअर नरेश गौतम, राष्ट्रीय कार्य. सदस्य ऋषिकेश गौतम, डाॅ. हरगोविंद टेंभरे, पोवारी साहीत्य मंडळाचे अध्यक्ष इंजिनिअर गोवर्धन बिसेन, पोवार समाजाचे भाट कृष्णकिसन राव बिसेन, आमगांव तालुका पोवार समाजाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एम.कटरे (सेवानिवृत्त), केंद्र प्रमुख एच.पी.पटले (सेवानिवृत्त), सभापती इंजिनिअर मनोज बोपचे पं. स. गोरेगांव, सभापती राजेंद्र गौतम पं. स. आमगांव, उपसभापती इंजि. महेश बिसेन, गोंदिया जिल्हा मुख्य कार्यकारीणी सचिव रोषनकुमार रहांगडाले, युवक कार्यकारीणी जिल्हा उपाध्यक्ष युमेश गौतम, आमगांव तालुका महिला कार्यकारीणी अध्यक्ष सौ. लक्ष्मीताई येळे व सालेकसा तालुकाध्यक्ष सौ. वर्षाताई रहांगडाले मंचकावर उपस्थित होते.
सकाळी 9.30 वाजेपासून पोवार साजाचे आराध्य दैवत महाकाल, शारदामाता, कुलदेवी माता गडकालीका, भगवान श्रीराम यांचे स्मरण करून चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या प्रतिकात्मक रूपात विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी धामनगांव येथील जानेवारी 2020 पासून शासकीय सेवेत रूजू झालेल्या 17 तरूण, तरूणींचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक महेश ठाकरे यांनी प्रस्तुत केले.
संचालन शिक्षक बी.एस. सोनवाने (सेवानिवृत्त) यांनी केले.
आभार समीतीचे अध्यक्ष इंजि. जयप्रकाश पटले यांनी व सचिव शामलाल ठाकरे, गंगाप्रसाद टेंभरे सह समीतीच्या सर्व पदाधिकार्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
स्नेह भोजनानंतर तिन अंकी हिंदी भाषिक नाटकाचे प्रस्तुतीकरण करण्यात आले.