शिक्षण परिषदेतून नव्या कल्पनांची निर्मिती – केंद्र कातुर्लीची 7 वी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

0
244
1

मोहगाव येथे शिक्षकांच्या प्रेरणादायी स्नेहमेळाव्याचा यशस्वी आयोजन

आमगांव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोहगाव येथे आज केंद्र कातुर्लीच्या 7 व्या शिक्षण परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले. या परिषदेचे अध्यक्षस्थान सौ. निशा येळणे, केंद्रप्रमुख, कातुर्ली यांनी भूषवले. परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश रहांगडाले (मुख्याध्यापक, करंजी), सौ. सुरेखा नाईक (मुख्याध्यापिका, सितेपार),  भालेकर (मुख्याध्यापक, कातुर्ली),  कुथे (मुख्याध्यापक, मोहगाव), बारसकर (मुख्याध्यापक, सुपलीपार), बिसेन (मुख्याध्यापक, पाटीलटोला) आणि कु. हिना बोपचे (मुख्याध्यापिका, डोंगरगाव) हे उपस्थित होते.

परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर अध्ययन निष्पत्ती व मूल्यांकन – कु. सरीका मडावी (वि.शि., मोहगाव),वाचन कौशल्ये व इंग्रजी अध्यापन –  सुनिल हरिणखेडे (स.शि., भोसा),क्षेत्रभेटीचे महत्त्व –  जयपाल ठाकुर (स.शि., सुपलीपार),पुस्तक परिचय –  एस. आर. मेंढे (मुख्याध्यापक, करंजी),निपुण भारत अभियान आणि पायाभुत साक्षरता व संख्याज्ञान (FLN ) – जी. बी. नान्हे या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल चर्चा केली.

परिषदेत चर्चिले गेलेले विषय : घरघर संविधान, अपार आयडी, मिड-डे मील, हॅकेथॉन, रंगोत्सव, भाषा उत्सव, आणि परीक्षा पे चर्चा या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन महेंद्र कुथे (मुख्याध्यापक, मोहगाव) यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले. परिषदेचे सुत्रसंचालन  रोशन बिसेन (मोहगाव) यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. ममता शिवनकर यांनी केले.

परिषदेच्या यशस्वीतेसाठी कु. वैशाली भुते (स.शि.), सौ. रेखा शहारे (स्वयंसेवक), कांताबाई भांडारकर, कांताबाई शहारे आणि केंद्रातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले.

शिक्षकांच्या एकत्रित सहभागातून नव्या शैक्षणिक कल्पना आणि पद्धती विकसित करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल शिक्षण क्षेत्राला निश्चितच प्रेरणादायी ठरेल.